fbpx

TNAI Maharashtra

TNAI Maharashtra

The Trained Nurses’ Association of India (TNAI), Maharashtra State Branch ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र शाखा हि सर्वात जुनी आणि शंभर वर्षाहून अधिक काळ सतत कार्यरत असलेली शाखा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तिचे मुख्य कार्यालय मुंबईतील विविध रुग्णालयात होते. टी एन ए आय ची स्थापना जे जे रुग्णालयात झाली होती (१९०८). त्यामुळे जे जे रुग्णालयातच पुढे मुंबई सिटी ब्रांच व महाराष्ट्र ब्रांच ह्यांची कार्यालये होती. महाराष्ट्र शाखेचे कार्यालय काही काळ नागपूर येथेही होते. पूर्णवेळ कार्यालय नसल्यामुळे ज्या ठिकाणी अध्यक्ष व सेक्रेटरी असतील तिथे कार्यालय असायचे. मुंबई शाखेचे कार्यालय पुढे बॉम्बे हॉस्पिटल मध्ये व त्यानंतर के ई एम हॉस्पिटल मध्ये दीर्घ काळ होते. तसेच महाराष्ट्र शाखेचे कार्यालय कुपर हॉस्पिटल मधेही काही काळ होते. महाराष्ट्र शाखेचे पूर्ण वेळ व कायमस्वरूपी कार्यालय असावे ह्यासाठी १९८० पासून प्रयत्न सुरु होते व त्यासाठी काही निधीची तरतूदही केली होती.

top